भोर प्रतिनिधी : स्वप्नीलकुमार पैलवान
भोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बूथ कमिटीची आढावा बैठक घेवून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. भोर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तालुक्यातील व शहरातील बूथ कमिटीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व बारामती मतदार संघाच्या लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भोर येथील यशवंत लॉन्स येथेल हॉल मध्ये संपन्न झाली.
यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्येक गावातील बुथ अध्यक्ष तसेच कार्यकर्त्यांशी खासदार सुळे यांनी संवाद साधत मार्गदर्शन केले. आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी खा. सुप्रिया सुळे यांनी विशेष लक्ष दिले आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तज्ञ संचालक पदी भालचंद्र जगताप यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

या बैठकीला राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, विक्रम खुटवड, भालचंद्र जगताप, संतोष घोरपडे, चंद्रकांत बाठे, मानसिंग धुमाळ, रविंद्र बांदल, विलास वरे, सुनिल भेलके, विठ्ठल शिंदे, यशवंत डाळ, प्रकाश तनपुरे, बी. डी. गायकवाड, ज्ञानोबा धामुनसे, गणेश खुटवड, कुणाल धुमाळ, सुरेश कडू, दगडू दामगुडे सह पदाधिकारी, बुथ अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.





