गजानन गव्हाणे पाटील
मटण आणले नाही या किरकोळ कारणावरून खून करून पळालेल्या दोन आरोपींना लोणीकंद पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने कर्नाटक येथून जेरबंद केले. ही घटना वाडेबोलाई येथे ऑगस्ट मध्ये घडली होती. या उल्लेखनीय कार्याबद्दल पोलीस आयुक्तांनी तपास पथकाचा सत्कार केला. शंकर राजा नाईक असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर या प्रकरणी राजू उर्फ मोठा बल्ला रामण्णा पवार व नवीन उर्फ छोटा बल्ला रामण्णा पवार असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
वाडेबोल्हाई येथे असताना या दोघांनी किरकोळ कारणावरून शंकर यांचा डोक्यात दगड घालून खून केला. यानंतर ते दोघे फरार झाले. तपास पथकाने त्यांच्याच नागरिकांकडून माहिती घेत कर्नाटक मधील एच एन हेल्ली या गावी त्यांना जेरबंद केले. तपास पथक कर्नाटक येथील गावात पोहचल्यानंतर ते शेतात लपलेले होते. पोलीस आल्याची कुणकुण लागताच त्यांनी धूम ठोकली. मात्र तपास पथकाने पाठलाग करून त्यांना पकडले.
ही कामगिरी परिमंडळ चारचे उपायुक्त रोहिदास पवार, सहायक आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, गुन्हे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव, सागर जगताप, चंद्रकांत माने, आशिष लोहार, अजित फरांदे, कैलास साळुंखे या पथकाने ही कामगिरी केली. पोलीस आयुक्तांनी या कामगिरीबद्दल पथकातील सहा जणांचा सत्कार केला.
मुख्य संपादक : गजानन बाळासाहेब गव्हाणे UDYAM REG. NO. : MH-26-0242806





