पुणे प्रतिनिधी : नयना पाचारणे
आंबेगाव येथील श्रीचक्रधर परमानंद शिक्षण संस्थेच्या श्रीचक्रधर बालक मंदिर, श्रीचक्रधर विद्यामंदिर प्राथमिक शाळेमध्ये बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्रीकांत नांगरे व ज्या मुलांचे वाढदिवस होते त्या सर्वांना गुलाबपुष्प देऊन तसेच केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
या प्रसंगी पुणे महानगर पालिकेच्या या भागाच्या नगरसेविका स्मिताताई सुधीर कोंढरे, संस्थेचे अध्यक्ष महेंद्रदादा कोंढरे व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी महिला शिक्षकांनी रांगोळ्यांचे, फुला- पानांचे सडे घालून फुग्यांची सुंदर आरास केली होती. फलक लेखनाच्या माध्यमातून सर्व मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे नियोजन संस्थेच्या कार्याध्यक्षा मेघाताई संजय कोंढरे, संस्था सदस्या सुवर्णाताई कोंढरे, संस्था प्रतिनिधी मोनालीताई कोंढरे, कोमलताई कोंढरे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक विश्वास कोचळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी केले. सर्वांच्या सहकार्याने अनोखा बालदिन साजरा करण्यात आला.





