गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा, ता. शिरुर येथील ज्ञानांकुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सनराईज इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष भगवान भंडारे व सचिव कांतीलाल फडतरे यांच्या हस्ते भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी संस्थापक संजय फडतरे, उपाध्यक्ष मोहिणी फडतरे, सचिव ज्योती फडतरे, सचिन भंडारे, ज्ञानेश्वर भंडारे, मोनिका भंडारे, शारदा भंडारे, शहाजी फडतरे, आनंदा फडतरे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा लंघे – घुटे आदी मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीतम्मा हलदार, रिद्धी साळके, यश परताळे, उस्मान शेख, संचेती शिंदे या विद्यार्थ्यांनी चाचा नेहरू यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केली. मनीषा वाघमारे, सीमा दांडे, अश्विनी उन्हाळे यांनी वेगवेगळ्या खेळांचे आयोजन केले. भारती शिंदे, निर्मला मुरकुरे, बेबी झावरे, रोहिणी शिंदे, सुजाता गवळी, शीतल ताठे, गीता ढगे, संगीता पारखे, अमृता गव्हाणे, बंदना कुमारी, विजयमाला कंद, या शिक्षकांनी मुलांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

स्वप्नाली गावठे यांनी सूत्रसंचालन केले. तर आरती मायने यांनी आभार मानले.





