- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणबालकाना दर्जेदार शिक्षणा बरोबर सुसंस्काराची जोड हवी : प्राचार्य एम. टी. कुंभारकर

बालकाना दर्जेदार शिक्षणा बरोबर सुसंस्काराची जोड हवी : प्राचार्य एम. टी. कुंभारकर

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रभागी असलेल्या कोरेगांव भिमा, ता.शिरुर येथील श्री हनुमान सेवा मंडळाच्या वतीने बालदिनाच्या औचित्य साधून छत्रपती संभाजी हायस्कूल मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
पंचायत समिती माजी सदस्य पी. के. गव्हाणे, बबनराव गव्हाणे, अप्पासाहेब फडतरे, सुनिल सव्वाशे, सुनिल नांदगुडे, रामदास गव्हाणे, विजय देशमुख, मारुती धुमाळ आदी उपस्थित होते.
कुंभारकर म्हणाले, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिवस बालदिन म्हणून देशभर साजरा केला जातो. यातून बालकांचे महत्व अधोरेखित होते. आई वडील मुलांसाठी किती कष्ट घेतात या पेक्षा संस्कार काय करतात यास महत्व आहे. तुमचा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण मुलांसाठी महत्वाचा आहे.


दहावी बारावी प्रथम आलेले विद्यार्थी, शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी श्री हनुमान ची आरती मान बाल दिनाचे औचित्य साधत मुलांना देण्यात आला .
शिरुर हवेली प्रासादिक दिंडीचे सचिव के. डी. गव्हाणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर सतिश जंगम यांनी आभार मानले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page