भोर प्रतिनिधी : स्वप्नीलकुमार पैलवान
भोर तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागातील ग्रामस्थांची खरी गरज ओळखून या परिसरातील डोंगरभागातून जिवंत पाणी शोधून कुंबळे, बोपे, चांदवणे येथे प्रत्येकी १२ हजार लिटर तर वाघमाची येथे २० हजार लिटर पाण्याची टाकी बांधन्याचे काम रोटरी क्लब ऑफ भोर – राजगड व वेस्ट क्लब ऑफ – पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

रोटरी क्लब भोर राजगड च्या अध्यक्षा सुवर्णा मळेकर यांचे हस्ते या जलकुंडांचे उद्घाटन झाले. यावेळी पुणे वेस्ट क्लबचे प्रेसिडेंट भिडे, पास्ट प्रेसिडेंट कोठारी, प्रोजेक्टर डायरेक्टर विनय कुलकर्णी, रोटरियन संपत मळेकर, सरपंच विजय बलकवडे, अशोक पडवळ, लक्ष्मण कचरे, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या जलकुंड च्या कामासाठी गावातील प्रत्येक व्यक्तीने मोलाचे सहकार्य केले. उस्फूर्तपणे श्रमदान करून कामास हातभार लावला. वाघमाची कुंबळे येथे मुख्य रस्त्यापासून तीन किलोमीटर पायी चालत जावे लागते. भोर ते बोपे अंतर ७५ किलोमीटर असल्याने साहित्याची वाहतूक करणे खूपच अवघड होते. प्लास्टर सॅंड तसेच इतर साहित्य नेआन करताना वाहतुकीस अडचण झाली. अशा अडचणीच्या परिस्थितीतुन जलकुंड प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. याभागातील नागरिकांची परिस्थिती पाहता श्रमदान करणाऱ्या व्यक्तीस त्याच्या कामाचा मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ही मळेकर यांनी सांगितले. या कामासाठी २० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य रोटरी क्लबच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले.

अशा कठीण परिस्थितीतुन जलकुंड प्रोजेक्ट उत्कृष्टपणे पूर्ण करण्यात आल्याने समाधान झाले असल्याचे महिलांनी आपली लोकशाही शी बोलताना सांगितले.
कुंबळेचे सरपंच विजय बलकावडे यांनी आभार मानले.





