हिरडस मावळ प्रतिनिधी : दीपक पारठे
मागील पंचवीस वर्षांच्या मागणीला अखेर यश आले असून जागतिक अपंग दिनानिमित्त राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय सुरू करण्यात येणार आहे. या निमित्ताने भोर तहसील कार्यालय व भोर नगरपालिकेसमोर ढोल ताशाच्या गजरात व फटाके फोडून लाडू व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. जोरदार घोषणा देत सरकारचे अभिनंदन करण्यात आले.
तब्बल पंचवीस वर्षापासून दिव्यांग मंत्रालयाची मागणी करण्यात येत होती. अखेर सरकारने ऐतिहासिक निर्णय प्रहार अपंग क्रांती संघटना आंदोलन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांचे प्रयत्न मधुन महाराष्ट्र राज्य सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यात आले.

यावेळी तालुका प्रहार अपंग संघटनेचे अध्यक्ष बापू कुडले, भानुदास दुधाने, दत्ता हिंगे, राजकुमार मोरे, पांडुरंग दिघे, महिला अध्यक्षा मनीषा गायकवाड, सत्वशीला सणस, महेंद्र सोनवणे, महिला उपाध्यक्ष संगीता शिवतारे, गणपत धोंडे, प्रदीप शिनगारे, बाबू कंक, अमोल नांगरे, विठ्ठल बुदगुडे, मोहन शेटे तसेच भोर शहराध्यक्ष सतीश शिर्के, उपाध्यक्ष सुनील पळशीकर, सचिव अशोक मोरे, प्रिया शेख, महिला अध्यक्षा संगीता बहिरट, उपाध्यक्ष शाईन शेख, बबन शिंदे, बाळासाहेब उन्हाळकर, रोहिदास बोडके, अनिल गिरे रमेश गुरव प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तालुक्यातील मोठ्या संख्येनेचे दिव्यांग बांधव उपस्थित होते





